जिल्ह्यात दमदार पाऊस heavy rainfall

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
चंद्रपूर,
heavy rainfall जिल्ह्यात बुधवारी रात्रभर सर्वत्र दमदार पाऊस झाला. त्यानंतर गुरुवारी सकाळी चंद्रपूर शहरासह काही तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. तर दिवसभर खंडित स्वरूपात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच होता.

heavy rainfall lashes chandrapur district as 67.5 mm rain recorded in 24 hours
जिल्ह्यात मंगळवारी ‘रेड अलर्ट’ घोषित करण्यात आला होता. मात्र, पावसाने हुलकावणी दिली. नाही म्हणायला, काही ठिकाणी पाऊस हलक्या स्वरूपाचा झाला. मात्र, बुधवारी रात्रभर महानगरासह जिल्ह्यात आलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. चंद्रपूर-नागपूर महामार्गासह अनेक रस्ते जलमय झाले. हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्यासाठी गुरुवारी पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
 
 
हवामान विभागाच्या इशार्‍यानंतर जिल्ह्यात गुरुवारी सलग दुसर्‍या दिवशी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. दरम्यान, बुधवारी रात्रभर कोसळल्यानंतर गुरुवारी सकाळी चंद्रपूर शहरासह काही तालुक्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली, तर काही भागांत रिमझिम पाऊस सुरू होता. सध्या जिल्ह्यात पाऊस खंडित स्वरूपात सुरू आहे. या खंडित पावसाचा फायदा शेतकर्‍यांना होत असून, नागभीड ब्रम्हपुरी, मूल आदी तालुक्यात भात पिकाच्या रोवणीच्या कामांना चांगला वेग आला आहे. शेतकरी उपलब्ध ओलाव्याचा लाभ घेत शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तसेच सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकर्‍यांनाही या पावसाने दिलासा मिळाला आहे.==
24 तासात जिल्ह्यात 67.5 मिमी पाऊस
मागील 24 तासात जिल्ह्यात 67.5 मिमी पाऊस पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 178 मिमी पाऊस बल्लारपूर तालक्यात, तर सर्वांत कमी 31.0 मिमी वरोडा तालुक्यात पडला आहे. तसेच गोंडपिरी 122.3 मिमी, ब्रम्हपुरी 103.4 मिमी, राजुरा 100.9 मिमी, कोरपना 86.3 मिमी, जिवती 84.8 मिमी, चंद्रपूर 75 मिमी, सावली 70.5 मिमी, सिंदेवाही 66.5 मिमी, मूल 65.5 मिमी, भद्रावती 60.5 मिमी, तर चिमूर तालुक्यात 37.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर यंदाच्या पावसाळ्यात 30 जुलैपर्यंत 278.6 मिमी पाऊस झाला आहे.