पावडे चौक आता स्व. श्री. दत्ताजी मेघे चौक

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
pavde-chowk : वर्धा नगर परिषदेच्या आज ३० रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रभाग ७ मधील गोंड प्लॉट येथील मुख्य चौकाला स्व. श्री. दत्ताजी मेघे चौक असे नामकरण करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. या चौकाची ओळख आधी पावडे नर्सिंग चौक अशी होती.
 
 
jk
 
प्रभाग ७ च्या नगरसेवक श्वेता वरुण पाठक यांनी निवेदनाच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधत दत्ता मेघे यांचे समाजासाठी व वर्धा शहराच्या विकासासाठी मोठे योगदान आहे. त्यामुळे गोंडप्लॉट भागातील पावडे चौकाला स्व. श्री. दत्ताजी मेघे असे नाव देण्याची मागणी करण्यात आली. नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. त्यामुळे या भागाला एक नवी ओळख मिळणार आहे. या निर्णयाबद्दल नगरसेवक श्वेेता वरुण पाठक, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकुर, आदींचे आभार मानले.