कळमन्यातील सेक्स रॅकेटवर छापा

- दलाल महिला अटकेत, पीडिते महिलेची सुटका

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
raid-on-sex-racket : नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कळमन्यात सुरू असलेल्या कथित सेक्स रॅकेटवर धाड टाकून एका दलाल महिलेलाअटक केली, तर एका देहव्यापाराच्या दलदलीत अडकलेल्या पीडित महिलेची सुटका केली. या कारवाईनंतर संबंधित महिलेविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
KL
पोलिसांना कळमना परिसरात एका ठिकाणी आंबटशौकीन ग्राहकांकडून पैशांच्या मोबदल्यात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दर्शन पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने नियोजनबद्ध सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान संबंधित महिला ग्राहकांना जागा उपलब्ध करून देत वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाले. छाप्यात पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली. घटनास्थळावरून रोख रक्कम व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या महिलेला आणि जप्त मुद्देमालाला पुढील कायदेशीर कारवाईसाठी कळमना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
 
 
ही कारवाई नागपूर शहर पोलिसांच्या मानवी तस्करी आणि अनैतिक वेश्या व्यवसायाविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली. शहरात अशा प्रकारचे बेकायदेशीर धंदे चालविणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त दीपक अग्रवाल, सहायक पोलिस आयुक्त वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दर्शन पाटील, एपीआय शिवाजी ननावरे, पोलिस हवालदार लक्ष्मण चौरे, नितीन वासने, कुणाल बोडखे, कमलेश क्षीरसागर, लता गवई यांनी केली.