राजकुमार जाजू यांना राष्ट्रीय सन्मान मिळाला!

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
वर्धा,
rajkumar jaju वर्धेच्या माहेश्वरी मंडळाचे समन्वयक आणि रोटरी लब गांधी सिटीचे जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाजू यांनी श्री माहेश्वरी सेवा मंच परिवार आणि माहेश्वरी महिला मंडळ, अमरावती यांनी आयोजित केलेल्या अखिल भारतीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. अमरावती येथील राठी एज्युकेशन हब येथे आयोजित शानदार कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 

rajkumar jaju wins national honour in all india essay competition for social thoughts 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक रमण हेडा होते तर अमरावती येथील माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष सुरेश साबू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर सेवा मंचचे अध्यक्ष सुनील मंत्री, सचिव संजय भुताडा, आरती देवी जाजू, आदी उपस्थित होते.
 
‘हास्याचा लुप्त होत जाणारा आवाज विचार आणि निराकरण’ हा निबंधाचा विषय होता. वास्तवस्थितीवर लक्ष केंद्रीत करत व्यापारी असलेल्या राजकुमार जाजू यांनी या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. ७ हजार १ रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. समावेश होता.
 
 
राजकुमार जाजू म्हणाले, हा पुरस्कार केवळ माझ्या लेखनासाठी नाही, तर एका सामूहिक चिंतेसाठी आहे. कोणत्याही संस्कृतीचा श्वास तिच्या नवीन पिढीत असतो. मुलांचे हास्य हे ते संगीत आहे जे संस्कृतीला जिवंत ठेवते. जेव्हा अंगणे शांत होतात, तेव्हा इतिहासही शांत होतो. आज, आपण करिअरच्या वेदीवर विवाहाचा किंवा अपेक्षांच्या वेदीवर नात्यांचा बळी देऊ नये. आपल्या मुळांकडे परत जाण्याची आणि कुटुंबाला पुन्हा समाजाचे केंद्र बनवण्याची वेळ आली असल्याचे विचार त्यांनी व्यत केले. जाजू यांनी घोषवाय लेखन, नाटक लेखन, पत्रलेखन, वादविवाद आणि परिसंवाद यांसारख्या प्रकारांमध्ये ७५ हून अधिक जिल्हा, विदर्भ, राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.