रामकृष्ण वाघ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Ramkrishna Wagh College छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेच्या संचालिका प्राचार्या डॉ. लता वाघ, स्थायी सदस्य प्रा. नकुल वाघ, प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.
 

solo 
 
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व माता सरस्वती तसेच महर्षी व्यास यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रा. सचिन देशमुख व प्रा. हर्षल रोठे यांनी गुरुस्तवन सादर केले, तर प्रा. आशिष उपाध्याय यांनी गुरु-शिष्य परंपरेवरील कविता सादर केली.डॉ. लता वाघ यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रिन्सि भुरा यांनी, सूत्रसंचालन प्रा. वर्षा सातपुते यांनी, तर आभार प्रा. सचिन देशमुख यांनी मानले. विद्यार्थी व प्राध्यापकांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
सौजन्य:सायली लाखे,पिदळी ,संपर्क मित्र