मुंबई
taarak mehta shoot ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारिया काही महिन्यांपूर्वी वडिलांच्या निधनामुळे मोठ्या दुःखातून गेला. गुजराती रंगभूमीवरील प्रख्यात अभिनेते आणि दिग्दर्शक अरविंद वेकारिया यांचे जून महिन्यात निधन झाले होते. वडिलांच्या निधनाची बातमी तन्मयला मालिकेच्या सेटवर शूटिंग सुरू असतानाच मिळाली होती. मात्र, त्याने शूटिंग अर्धवट न सोडता ते पूर्ण केले आणि त्यानंतरच वडिलांना अखेरचा निरोप देण्यासाठी तो रवाना झाला.
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तन्मय वेकारियाने यामागचे कारण सांगितले आहे. त्याने खुलासा केला की, त्याच्या वडिलांची शेवटची इच्छा होती की, जर मुलगा शूटिंग करत असताना त्यांच्या निधनाची बातमी मिळाली, तरी त्याने शूटिंग अपूर्ण सोडू नये. आधी काम पूर्ण करावे आणि त्यानंतरच कुटुंबाकडे जावे, अशी वडिलांची इच्छा होती. त्यामुळेच तन्मयने त्या दिवशी शूटिंग पूर्ण करून वडिलांना अखेरचा निरोप दिला.
तन्मय शूटिंगमध्ये व्यस्त असतानाच अरविंद वेकारिया यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मास्टर शॉट पूर्ण झाल्यानंतर ‘नट्टू काका’ची भूमिका साकारणारे अभिनेते किरण भट्ट यांनी तन्मयला रुग्णालयात पोहोचवले. त्यानंतरही संपूर्ण वेळ ते तन्मयसोबत राहिले. किरण भट्ट हे तन्मयच्या वडिलांचे जवळचे मित्रही होते.
या कठीण taarak mehta shoot काळात ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी आपल्याला मोठा आधार दिल्याचेही तन्मयने सांगितले. सुरुवातीला जेव्हा त्याला वडिलांच्या निधनाची माहिती मिळाली, तेव्हा असित कुमार मोदी यांनी त्याला शूटिंग थांबवून आधी कुटुंबाकडे जाण्यास सांगितले होते. मात्र, वडिलांच्या इच्छेनुसार तन्मयने शूटिंग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.असित कुमार मोदींबद्दल बोलताना तन्मय म्हणाला, “फक्त या दुःखद काळातच नाही, तर असित भाई नेहमीच माझ्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. ऑक्टोबर २०२५ मध्ये माझ्या आईचं निधन झालं होतं, त्यानंतर माझे वडील २४ जून २०२६ रोजी मला सोडून गेले. मी माझ्या आयुष्यात खूप काही गमावलं आहे. या प्रत्येक परिस्थितीत असित भाईंनी माझी साथ दिली. ते खूप दयाळू आहेत. त्यांनी माझी खूप मदत केली असून एका खंबीर भावाप्रमाणे ते माझ्या बाजूने उभे राहिले.”वडिलांच्या निधनानंतर तन्मय वेकारियासाठी हा काळ भावनिकदृष्ट्या अत्यंत कठीण होता. मात्र, वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करत त्याने आपल्या कर्तव्याला आणि कुटुंबीयांच्या भावनांना तितकेच महत्त्व दिले.