तभा वृत्तसेवा
ढाणकी,
dhanki-anganwadi : येथील प्रभाग 3 मधील अंगणवाडी क्रमांक 1 ची इमारत अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने अंगणवाडीत येणाèया तीन ते सहा वयोगटातील बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असे अंगणवाडी सेविका रेखा प्रकाश पाईकराव यांनी निवेदनातून ढाणकी नगर पंचायत मुख्याधिकाèयांच्या लक्षात आणून दिले आहे.
अंगणवाडीच्या खुल्या व्हरांड्यात मोकाट जनावरे व मोकाट कुत्रे घाण करत असून इमारतीच्या बाजूला एक निकामी पाण्याचे टाके बांधकाम असल्यामुळे त्याचा आडोसा घेऊन बाहेरून येणारी जनता, अर्थात दुकान लाईनमधील व्यापारी, आठवडी बाजाराच्या आजूबाजूचे रहिवासी, येथे येऊन अंगणवाडीच्या भिंतीचा व पाण्याच्या टाक्याचा आडोसा घेऊन त्या ठिकाणी संडास व लघवी करत असतात.
यामुळे अंगणवाडीमध्ये बालकांसाठी शिजवला जात असलेला पोषण आहार त्या घाणीच्या साम्राज्यामुळे, अंगणवाडीत बसून बालकांना खायला देणे शक्य नाही. तेव्हा येथील पाण्याचे निकामी टाके तोडून, अंगणवाडी क्रमांक 1 ला गेटसह वॉल कंपाऊंड करून देण्यात यावे, असे त्यांनी म्हटले आहे.
तसेच इमारतीवरील छताचे टिनपत्रे कुजलेले असून ते दुरुस्त करून देण्यात यावे. इमारतीच्या खिडक्या तुटलेल्या असून त्या खिडक्यांमधून दुर्गंध आणि सरपटणारे प्राणी आत प्रवेश करण्याची शक्यता आहे. सरपटणाèया प्राण्यांपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस व बालकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. स्थानिक नगर पंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची पालकांची मागणी आहे.
ही इमारत जिल्हा परिषदेची असली तरी, ही ढाणकी शहरात असल्यामुळे इमारतीची देखभाल, दुरुस्ती स्थानिक नगर पंचायतने विशेष बाब म्हणून तत्काळ याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी अंगणवाडी सेविका रेखा पाईकराव यांनी आपल्या निवेदनातून ढाणकी नपं मुख्याधिकाèयांकडे केली आहे.
यापूर्वीही दोनदा निवेदन देऊनसुद्धा कुठलही कार्यवाही झाली नाही. बालकांच्या भवितव्य व जीविताचा प्रश्न गांभीर्याने घेऊन, नपं प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी ढाणकीकरांकडून होत आहे.