३ ऑगस्टला ग्रामगीता प्रबोधनाचा जागर

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
नागपूर,
tidke-vidyalaya-katol-road कर्मश्री दुर्गादास रक्षक स्मृती सप्ताहानिमित्त 'ग्रामगीता प्रबोधन दिंडी – विद्यार्थ्यांच्या दारी' या उपक्रमाचे आयोजन रविवार, ३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता तीडके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, काटोल रोड येथे करण्यात आले आहे.
 

rakshk 
 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विलास रामटेके राहतील. प्रमुख वक्ते म्हणून श्रीगुरुदेव अध्यात्म गुरुकुलचे संचालक रवीदादा मानव मार्गदर्शन करतील. ज्ञानेश्वर रक्षक प्रास्ताविक करतील, तर मोहन चोरे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजने सादर करतील. गुरुदेव प्रचारक देवीदास लाखे, मुकेश कोल्हे यांची विशेष उपस्थिती राहणार असून विलास बोरगमवार दिंडीचे स्वागत करतील.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्मृती प्रतिष्ठानचे विश्वस्त अनंता रक्षक यांनी दिली
सौजन्य : ज्ञानेश्वर रक्षक,संपर्क मित्र