व्यंकटेश सिटीत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Venkatesh City Besa मुसळधार पावसामुळे बेसा परिसरातील व्यंकटेश सिटी येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तब्बल तीन तास परिसर पाण्याखाली राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
 

askhi 
 
पावसामुळे बेसा–घोगली मार्गावरील संपर्कही काही काळ खंडित झाला. स्थानिक नागरिकांनी ड्रेनेज व पाइपलाइनच्या कामांतील त्रुटींमुळे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याचा आरोप केला आहे. नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलल्याने पाणी थेट वसाहतीत शिरत असल्याचेही त्यांनी सांगितले.संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि कामातील त्रुटींची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सौजन्य : अशोक माटे,संपर्क मित्र