गोंदिया,
vinod-agarwal : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य शासनाच्या निर्देशानुसार 22 ते 28 जुलै या कालावधीत राज्यभर विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले. त्याअंतर्गत गोंदिया तालुक्यात प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत आमदार विनोद अग्रवाल यांच्या पुढाकाराने 200 क्षयरुग्णांना फूड बास्केटचे वाटप करण्यात आले.

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या विशेष अभियानात विविध आरोग्य तपासण्या, ग्रामपंचायत स्तरावरील जनजागृती तसेच प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत ‘निक्षय मित्र’ उपक्रमावर विशेष भर देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांनी समाजातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन ‘निक्षय मित्र’ बनावे व आर्थिकदृष्ट्या दुर्बल क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी फूड बास्केट उपलब्ध करून देऊन टीबीमुक्त भारत अभियानाला बळकटी द्यावी, असे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत आ. विनोद अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस व दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीच्या निमीत्ताने क्षयरुग्णांना फूड बास्केट देण्याचे आयोजन केले. या अनुषंगाने आ. विनोद अग्रवाल यांच्या पुढाकरातून तालुक्यातील सुमारे 200 क्षयरुग्णांना फूड बास्केट वाटप करण्यात आले.