मुळावा येथे महिलेची हत्या : आरोपीस अटक

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
woman-murdered-at-mulava : मुळावा येथील शांतीनगर परिसरात एका महिलेची कुèहाडीने वार करून हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली असून यातील आरोपीस अटक केली आहे. मृत महिलेचा मुलगा लक्ष्मण सरकुंडे यांनी पोफाळी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला आहे. त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. रुख्मा शंकर सरकुंडे असे मृत महिलेचे नाव आहे.
 
 
 
JKL
 
 
 
मुळावा येथे 56 वर्षीय रुख्मा शंकर सरकुंडे शांतीनगरात वास्तव्यास होत्या. गेल्या काही काळापासून गजानन खंडू डांगे (वय 38) याचा त्यांच्यासोबत वाद सुरू होता. आरोपी त्यांच्याशी वारंवार वाद घालत असल्याचे लक्ष्मण यांच्या तक्रारीत नमूद आहे.
घटनास्थळी उपस्थित नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन डांगे याने कुèहाडीने डोक्यावर वार करून ही हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
 
 
ठाणेदार निलेश शेंबडे यांनी फॉरेन्सिक पथकासह तत्काळ घटनास्थळाला भेट दिली. आरोपी गजानन डांगे याला अटक करण्यात आली असून उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार निलेश शेंबडे, जमादार शेरे व राजू पवार करीत आहेत.