जिल्ह्यात मुसळधार : प्रशासनाचा ‘रेड अलर्ट’

जुलै अखेरपर्यंत सरासरीच्या 90.4 टक्के पाऊस

    दिनांक :30-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
yavatmal-heavy-rain : यवतमाळ जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून अनेक भागांत पावसाचा जोर वाढला. शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत मध्यम ते मुसळधार सरी कोसळल्याने जनजीवनावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे.
 
 

y30July-Aarni 
 
 
दरम्यान, हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांसह यवतमाळमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तविली असून प्रशासनाने जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. या दरम्यान एक किंवा दोन ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाèयाचा इशारा दिला आहे. तसेच जिल्ह्यातील एक-दोन ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
 
 
जिल्हा प्रशासनाच्या पर्जन्यमान अहवालानुसार, जुलै महिन्यात आतापर्यंत जिल्ह्यात 238.9 मिमी पावसाची नोंद झाली असून, जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 372.8 मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीच्या 90.4 टक्के आहे.
 
 
जिल्ह्यातील झरी-जामणी येथे सर्वाधिक 160.5 टक्के, केळापूर येथे 99.8 टक्के, दारव्हा येथे 116.3 टक्के, आर्णी येथे 111.8 टक्के, नेर येथे 105.8 टक्के आणि वणी येथे 101.1 टक्के म्हणजेच वार्षिक सरासरी ओलांडणाèया पावसाची नोंद झाली आहे.
 
 
तर राळेगाव 65 टक्के, बाभुळगाव 67.2 टक्के आणि महागाव 70.3 टक्के या तालुक्यांमध्ये तुलनेने कमी पाऊस झाला आहे. यवतमाळ 74.4, कळंब 76.1, दिग्रस 95.5, पुसद 86.4, उमरखेड 81.4, महागाव 70.3, मारेगाव 92.2, घाटंजी 80 टक्के पाऊस कोसळला आहे.
 
 
सततच्या पावसामुळे नद्या-नाले वाहू लागले असून, शेतकèयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खरीप पिकांना या पावसाचा फायदा होणार असला तरी अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता नागरिक आणि शेतकèयांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 
आर्णीतील मुख्य रस्त्यावरील शेकडो दुकानांमध्ये पाणी
 
आर्णी : शहरात पहाटे 2 पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. बसस्थानकापासून मुख्य रस्त्यावरील नाल्याचे बांधकाम अपूर्ण राहिल्याने, मुख्य रस्त्यावरील बसस्थानक परिसरातील दुकानांमध्ये आणि माहेर मंगल कार्यालयाच्या आसपासच्या तळघरातील शेकडो दुकानांमध्ये पाणी शिरले. व्यापारी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या मालाचेही नुकसान झाले आहे.
 
 
यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये नगर परिषद विरोधात संताप निर्माण झाला आहे. नप अध्यक्ष नालंदा भरणे आणि उपाध्यक्ष निलेश गवांदे यांनी परिसरातील दुकानांना भेट दिली, व्यापाèयांशी संवाद साधला आणि त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. व्यापाèयांनी नाल्याच्या अपूर्ण बांधकामाबद्दल अधिकाèयांना धारेवर धरले आणि मदतीची मागणी केली.
 
 
बुधवार रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आर्णीमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. बसस्थानकापासून शहरातून वाहणाèया नाल्यापर्यंत सुमारे 4 फूट रुंदीच्या नाल्याचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या नाल्याचे बांधकाम अपूर्ण राहिल्याने, बुधवार रात्रीपासून सकाळपर्यंत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरले आणि पाणी साचल्याने दुकानांमध्ये ठेवलेला माल भिजला. काही गोदामांमधील माल भिजल्याने व्यापाèयांना उर्वरित माल वाचवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली.
सततच्या पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. शहराच्या अंतर्गत भागातील प्रत्येक परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
 
 
गुरुवारी सकाळी नप अध्यक्ष नालंदा भरणे आणि उपाध्यक्ष निलेश गवांदे यांनी परिसरातील दुकानांना भेट देऊन पाणी साचण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी तेथील व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी त्यांना शांत केले आणि हा प्रश्न लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.
 
 
गुरुवारच्या मुसळधार आणि जोरदार पावसामुळे शहरातील सोमनाथ टी सेंटर, पतंजली शॉप, मोबाईल गॅलरी, पंढरपुरी टी, शंकर प्लायवूड, व्यंकटेश मोबाईल, प्रतीक किराणा, अंजली ड्रेसेस, भोयर स्टील, वैभव जनरल, पूजा हॉटेल, रत्नकला शिवणक्लास, दक्ष एजन्सी, दत्ता टेलर, माहेर मंगल, राजधानी कलेक्शन, रमेश कलेक्शन, डॉ. थावकर फार्मसी, हाजी कलेक्शन, महालक्ष्मी हार्डवेअर, पुष्पम मशिनरीज यांचे पाणी साचल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
--