यवतमाळ,yavatmal-inundated : गुरुवारी पहाटेपासून यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील झरी-जामणी येथे सर्वाधिक 160.5 टक्के, केळापूर येथे 99.8 टक्के, दारव्हा येथे 116.3 टक्के, आर्णी येथे 111.8 टक्के, नेर येथे 105.8 टक्के आणि वणी येथे 101.1 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर यवतमाळ 74.4, कळंब 76.1, दिग्रस 95.5, पुसद 86.4, उमरखेड 81.4, महागाव 70.3, मारेगाव 92.2, घाटंजी 80 टक्के पाऊस कोसळला आहे. राळेगाव 65 टक्के, बाभुळगाव 67.2 टक्के आणि महागाव 70.3 टक्के या तालुक्यांमध्ये तुलनेत कमी पाऊस झाला आहे.
संततधार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा: भूजल पातळी वाढीचे संकेत, पिकांना संजीवनी
उमरखेड : तालुक्यात बुधवार, 29 जुलैपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकèयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच सलग दोन दिवस संततधार पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, भूजल पातळीतही वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबतही आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
यंदाच्या हंगामात सुरुवातीला पावसाने अनियमित हजेरी लावल्याने शेतकरी चिंतेत होते. अनेक भागांत पेरणीनंतर पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेला पाऊस वेळेवर न झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर, हळद आणि ऊस पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पाऊसझडीमुळे ही चिंता बèयाच प्रमाणात दूर झाली आहे.
शेतकèयांच्या शेतात उभे असलेले सोयाबीन आणि कापूस पिकांना या पावसाचा मोठा फायदा होणार आहे. हळद आणि ऊस यांसारख्या दीर्घकालीन पिकांसाठीही हा पाऊस पोषक ठरत असून, पिकांच्या वाढीस चालना मिळेल, असा कृषी क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे. पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने पिकांची वाढ जोमाने होण्याची अपेक्षा आहे.
सलग पावसामुळे विहिरी, बोअरवेल, शेततळी आणि लहान-मोठ्या जलस्रोतांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच रब्बी हंगामासाठीही पाण्याची उपलब्धता सुधारण्यास या पावसाचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकèयांच्या आशा आता पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, पावसाचा जोर असाच कायम राहील याचीही शक्यता कमी आहे. पण खरीप हंगामातील उत्पादनाबाबत शेतकèयांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत. भूजल पातळी वाढण्याची चिन्हे आणि पिकांना मिळालेली जीवनदायी ओल यामुळे ग्रामीण भागात आशादायक वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्याचा या कालावधीतील सरासरी पाऊस 413.2 मिमी असून प्रत्यक्षात 81.4 टक्के पाऊस झाला आहे. म्हणजेच तालुक्यात 76.9 मिमी पावसाची तूट कायम आहे. उमरखेड महसूल मंडळात जूनमध्ये 144.8 मिमी (90.2), जुलैमध्ये 191.5 मिमी (75.8) पाऊस झाला असून जूनपासून एकूण 336.3 मिमी (81.4) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी याच दिवशी 380.7 मिमी पाऊस झाला होता, तर यंदा तो 336.3 मिमी असून मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 44.4 मिमीने कमी आहे.
वाघाडी नदी दुथडी भरून वाहत आहे
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पारवा परिसरात वाहणारी वाघाडी नदी दुथडी भरून वाहत आहे. तालुक्यातील शरद येथील पुलावरून नदीच्या पाण्याचा प्रचंड वेगवान प्रवाह दोन्ही काठ ओलांडून वाहत असल्याचे दृश्य पहायला मिळत आहे. दोन दिवसांच्या या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दारव्हा येथे पावसाची दमदार हजेरी
दारव्हा : शहर आणि ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली. मध्यंतरी बèयाच कालावधीनंतर पावसाचे दमदार आगमन झाले. बुधवारपासून सतत पावसाची झड लागली असून आजची 19 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत 258 मिलीमिटर पाऊस झाल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार आंबेकर यांनी दिली.
सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत
मारेगाव : दोन दिवसांपासून सतत पावसाने नाल्यांना पूर आला आहे. नद्यांची पाणीपातळी वाढली असून शेती पिकाला संजीवनी मिळाली आहे. मात्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावरील वाहतूक कमी झाली असून सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. कधी रिपरीप तर कधी मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीच्या पातळीतही वाढ झाल्याने अनेक शेतांमध्ये पाणी घुसले आहे. मागील काही दिवसांपासून पाण्याची आतुरतेने वाट पाहणाèया शेतकèयांना या पावसामुळे संजीवनी मिळाली आहे. परंतु सतत पावसाची असलेली रिपरिप यामुळे मात्र सामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
नेर तालुक्यात सर्वदूर पाऊस
नेर : जून महिन्यात उशिरा सुरू झालेला पाऊस, त्यानंतर मोठी उघाड, कधी नुसतेच ढगाळ वातावरण, असा आतापर्यंतचा यंदाच्या पावसाचा प्रवास राहिलेला आहे. परंतु बुधवारी रात्री पावसाने बèयापैकी हजेरी लावल्याने शेतकèयांनी समाधान व्यक्त केले आहे. एकप्रकारे पिकांना संजीवनी मिळाली आहे. परंतु असे असले तरी अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा मात्र कायम आहे. पावसाचे दोन महिने उलटून गेले तरी विहिरींची पातळी अजीबात वाढलेली नाही. अशीच परिस्थिती कायम राहिली तर रब्बीची पिके घेणे शक्य होणार नाही असे सध्या तरी चित्र आहे. येणाèया काळात पाऊसमान कसे राहणार यावर सध्या शेतकरी वर्गात चर्चा आहे.