बालकांच्या कायदेशीर हक्कांवर जनजागृती

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
नागपूर, (सावनेर)
Bhalerao High School, Savner सावनेर येथील भालेराव हायस्कुल येथे तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन, सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने NALSA च्या लहान मुलांसाठी अनुकूल कायदेशीर सेवा-२०२४ अंतर्गत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अध्यक्ष तालुका वकील संघाचे एस. पी. जैन, सचिव ए. वाय. निंबाळकर, अधिवक्ता ए. जे. मुलमुले व ॲड. यु. आर. पवार यांनी विद्यार्थ्यांना बालकांच्या कायदेशीर हक्कांबाबत मार्गदर्शन केले.
 

bt 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एम. जे. मोहोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून पी. बी. मुंढे, धीरज गौतम, राहुल वानखेडे, मुख्याध्यापिका लोणकर व उपमुख्याध्यापक ज्ञानेश्वर जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन योगिता टुले यांनी, तर आभार प्रदर्शन स्मिता घोळमारे यांनी केले.
सौजन्य: अनिल सोळंकी,संपर्क मित्र