लंडन स्ट्रीटवर ६00 झाडे लावल्याचा बिल्डरचा दावा

- उच्च न्यायालयाने मागितली माहिती

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
london-street : नागपुरातील लंडन स्ट्रीट परिसरात बिल्डरने ६०० झाडे लावल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात लंडन स्ट्रीट परिसरात जावून पाहणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वकिलासह प्रतिवादींना दिलेत. नागपूर हिरवेगार शहर नसल्याचे मौखिकपणे उच्च न्यायालयाने एका प्रकरणात म्हटले होते. लंडन स्ट्रीट येथील एक कि.मी. परिसरात जागा आहे की नाही, हे बघावे आणि जागा असेल तर बिल्डरने एक हजार वृक्षारोपण करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत दिले होते. यावर बिल्डरने ६०० झाडे लावल्याचा दावा केला आहे.
 
 
 
ngp
 
खामला स्नेह संवर्धक रोड ते जयताळा रोड (लंडन स्ट्रीट) या विकास प्रकल्पाअंतर्गत प्रतिपूरक वृक्षारोपणाबाबत मोठी तफावत समोर आली आहे. प्रफुल्लव्हेड इन्फ्रा प्रा. लि. या कंपनीने सुमारे १० हजार झाडे लावण्याचे दायित्व स्वीकारले असताना प्रत्यक्षात केवळ ४,२१३ झाडांची लागवड करण्यात आल्याचे मनपाने मागील सुनावणीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले होते. दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार लंडन स्ट्रीट बाबत पर्यावरण परवानगीची पूर्तता करण्यात आली आहे काय, यासंदर्भात न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांनी कोर्ट मित्र अ‍ॅड. राहूल धांडे यांना माहिती सादर करण्याचे निर्देश दिलेत. सरकारतर्फे अ‍ॅड. दीपक ठाकरे, मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.