बुलढाणा,
buldhana heavy rain गेल्या तिन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत धुवाधार पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचले आहे तर प्रमुख प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली असल्याने पाणीटंचाईचे संकट बर्याचअंशी कमी झाले आहे. तर हवामान विभागाने येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बुलढाणा शहर व तेरा गावांना पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण १०० टक्के भरल्याने दि. ३१ जुलै रोजी दुपारनंतर साखळी पुलावरून पाणी गेल्याने वाहतुक ठप्प झाली होती. धरणाचे स्वयंचलित गोडबोले गेट उघडले.
जिल्ह्यातील मोठे प्रकल्प खडकपूर्णा उपलब्ध जलसाठा (४६.३८) दलघमी, नळंगगा (४३.६६), पेनटाकळी (३१.३६) येळगाव धरण (१००) टक्के दि. ३१ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र नदीनाले दूथडी भरून वाहत आहे. बुलढाणा चिखली महामार्ग येळगाव धरणाच्या साखळी येथील पूलावरून पाणी गेल्याने दुपारी १२ नंतर वाहतूक ठप्प करण्यात आली होती. त्यामुळे मलकापूर सोलापूर महामार्ग काही काळ बुलढाणा नजीक ठप्प झाला होता. पावसाचा जोर दि. ३१ जुलै रोजी दिवसभर कायम होता. सर्वाधिक पाऊस जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात झाला. (७१.९३) टक्के बुलढाणा (५२.३८), चिखली (७४.५०) दे. राजा (४६.१०), सिं. राजा (४२.७७), लोणार (३९.७८) टक्के, मेहकर (५१.८४) खामगांव (५०.३७) शेगाव (५९.९३), मलकापूर (४६.१७), नांदूरा (५७.९४) टक्के, मोताळा (५२.९९) टक्के, संग्रामपूर (४२.५०) टक्के), जळगाव जामोद (७१.९३) एकूण सरासरी ५०.६४ टक्के इतका पाऊस झाला आहे.
बुलढाणा चिखली मेहकर, मलकापूर, नांदुरा, शेगाव, खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर मोताळा, देऊळगावराजा, सिंदखेडराजा तालुयांमध्ये पावसाचा जोर कायम आहे सर्वच तालुयांमध्ये सर्वत्र सारखाच पाऊस कोसळत असल्याने अनेक शेतात पाणी साचले आहे. परिणामी शेतीची कामे रखडली आहेत. काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याने पाण्याची तळे निर्माण झाली आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकर्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला, तरी अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांना नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाणीटंचाईची चिंता कमी झाली असली, तरी अतिवृष्टीमुळे निर्माण होणार्या संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज आहे.