मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात ऐतिहासिक कर्जमुक्ती : डॉ. अशोक नेते

(पत्रपरिषदेतून डॉ. अशोक नेते यांनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन)

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
गडचिरोली, 
ashok-nete : देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) यांच्या नेतृत्वातीत सरकारने शेतकर्‍यांच्या हिताचा एवढा मोठा निर्णय घेतला आहे. माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रपरिषदेत शेतकर्‍यांची सरसकट कर्जमुक्तीच्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.
 
 
K  
 
डॉ. अशोक नेते पुढे म्हणाले की, फडणवीस सरकारने त्यांच्या काळात दोन वेळा कर्जमुक्ती केली. पहीली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी जी 38 हजार कोटींची होती. तर आता अहिल्यादेवी कर्जमुक्ती योजनेते तब्बल 56 हजार कोटी रुपयांचा लाभ शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. याशिवाय महिला शेतकरी सक्ष्मीकरण विधेयक आणले. यातून महाराष्ट्रातील महिला बचत गटांना प्रत्येकी 1 लाख रुपये देण्यात आले. याशिवाय जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु केली. भाजपच्या सरकारच्या काळात अशा अनेक जनकल्याणकारी व शेतकरी उपयोगी निर्णय घेतले जात असल्याने देश जगात तिसर्‍या क्रमांकावर आला आहे. येत्या काळात देश जगात पहिल्या क्रमांकावर असणार असल्याचे ते म्हणाले.
 
 
यापूर्वी शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईसाठी तलाठी, मंडळ अधिकारी किंवा तहसीलदार जावे लागत होते. मात्र आत एआयच्या माध्यमातून डिजीटल सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे गैरव्यवहारावर आळा बसणार आहे. 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्यावरच नुकसनभरपाई मिळत होती. आता मात्र ती 50 टक्क्याच्या खाली जरी नुकसान झाले असेल तरी शेतकर्‍यांना नुकसानीच्या दिडपट नुकसानभरपाई मिळणार असल्याचे डॉ. अशोक नेते यांनी सांगीतले.
 
 
या पत्रपरिषदेला माजी खासदार डॉ. अशोक नेते यांच्यासह, भाजपा आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, आमदार डॉ. मिलींद नरोटे, बाबुराव कोहळे, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, डॉ. नितीन कोडवते, डॉ. चंदा कोडवते, प्रकाश गेडाम, अनिल कुनघाडकर, दत्तू सुत्रपवार यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.