बुलढाणा,
swati-rajeshwar-uberhande : येथिल प्रसिद्ध आयुर्वेद स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ व आयुर्वेद महाविद्यालयाच्या संचालीका, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. स्वाती राजेश्वर उबरहंडे यांना दि. २८ जुलै रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २५ व्या दिक्षांत समारंभात नाशिक येथे राज्याचे राज्यपाल कुलपती विष्णुदेव वर्मा ह्यांच्या हस्ते आचार्य पदवी प्रदान करण्यात आली यावेळी अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ व एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ. अनंत पांढरे व विभागीय कुलगुरु प्रा. डॉ. संजीव सोनवने, रजिस्टार राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ.संदिप कडू, अधिष्ठाता मिलिंद आवारे व सिनेट सदस्य ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
२५ वर्षापासून डॉ. स्वाती राजेश्वर उबरहंडे आयुर्वेद स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ म्हणून बुलढाणा जिल्हातील रुग्णांची सेवा करीत आहेत. रुग्णसेवेचे व्रत सुरु असतांनाच २०१४ मध्ये डॉ. राजेंद्र वाघ, डॉ. राजेश्वर उबरहंडे, मधुकरराव जायभाये पंजाबराव इलग या सहकार्यासह त्यांनी ए.एस.पी.एम आयुर्वेद महाविद्यालयाच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले
श्रीकांत देशमुख ह्यांच्या मागर्दर्शनात आपली संशोधन कार्य पूर्ण केले. हया यशाबद्दल ए.एस.पी.एम. आयुर्वेद महाविद्यालयाचे वतीने त्यांच्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र वाघ व सहकारी प्राध्यापक वृंद व विद्यार्थी वर्गाचे वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.