बुलढाणा,
garde-library : दै. तरूण भारतचे माजी मुख्यसंपादक तथा जेष्ठ पत्रकार स्व. लक्ष्मणराव त्र्यंबकराव जोशी यांचे दि. २८ जुलै रोजी निधन झाले. त्या निमित्ताने गर्दे वाचनलयाच्या वतीने दि. ३० जुलै रोजी श्रद्धाजंली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गर्दे वाचनालयाचे सचिव उदय देशपांडे हे उपस्थित होते. तर मंचावर ग्रंथालय भारतीचे राष्ट्रीय सचिव सुनिल वायाळ ग्रंथपाल नेमिनाथ सातपुते, व भाम संघाचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष तथा तरूण भारतचे क्रीडा प्रतिनिधी रविंद्र गणेशे उपस्थित होते.

सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या वतीने दिवंगत लक्ष्मणराव जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून श्रद्धाजंली वाहण्यात आली. याप्रसंगी सुनील वायाळ म्हणाले तरूण भारतचे मुख्य संपादक असतांना ल. त्र्य. जोशी यांनी तरूण भारत वाचकांची संख्या वाढविण्यासाठी आपल्या लेखणीतून प्रयत्न केले. समाजप्रबोधन करण्याचे काम त्यांनी केले. संघविचाराशी ते एकनिष्ठ होते. याप्रसंगी रविंद्र गणेशे यांनी ल. त्र्य. जोशी यांच्या जिवनातील प्रसंग सांगत त्यांचा दोन वेळा भेटीचा योग आला. प्रामाणिक, निर्भीड अशी ल. त्र्य. जोशी यांची पत्रकारिता होती. नवोदित पत्रकाराचे ते मार्गदर्शक होते. तरूण भारत मधील त्यांचे संपादकीय लेख नेहमी वाचायचो असे त्यांनी असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय श्रद्धाजंली वाहतांना उदय देशपांडे म्हणाले की, ल. त्र्य. जोशी व माझे वडील भास्करराव देशपांडे यांचे मैत्रीचे संबध होते. ते दोन वेळा बुलढाण्यात आल्यानंतर गर्दे वाचनालयाला भेटी दिल्या. आणि गर्दे वाचनालयाच्या विविध उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. नागपूरला गेल्यावर नेहमी त्यांची भेट व्हायची अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे ते होते. अशा शोक संवेदना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे संचलन ग्रंथपाल नेमिनाथ सातपूते यांनी केले. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक अरविंद होंडे, श्रीकांत कुळकर्णी यांचेसह वाचक सभासद उपस्थित होते.