अतिवृष्टीसदृश पाऊस परिस्थितीचा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतला आढावा

तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांना गावात उपस्थित राहण्याच्या सूचना

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
बुलढाणा
heavy rainfall जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीसदृश पावसामुळे अनेक तालुयांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीपिके, घरे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान होण्याची शयता निर्माण झाली आहे. विशेषतः संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुयांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण देवरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील पावसाच्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली.
 
 

heavy rainfall in buldhana: union minister prataprao jadhav reviews flood-like situation
यावेळी केंद्रीय राज्यमंत्र्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देत गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांनी मुख्यालयी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवावे, अशी सूचना दिली. तसेच नदीकाठच्या गावांतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या शेतीचे तातडीने पंचनामे करावेत आणि पडझड झालेल्या घरांचेही त्वरित पंचनामे करून मदत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ३० आणि ३१ जुलैदरम्यान जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेतजमिनींमध्ये पाणी साचले असून पिकांचे नुकसान, माती वाहून जाणे आणि घरांची पडझड होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून महसूल, कृषी आणि ग्रामविकास यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी अनावश्यकपणे नदी-नाल्यांमध्ये किंवा पूरग्रस्त भागात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव जामोद तालुयात सर्वाधिक २०७.४ मिमी पावसाची नोंद झाली. नांदुरा १७४.८ मिमी, खामगाव १५२.१ मिमी, शेगाव १३९.७ मिमी, मलकापूर १३७.२ मिमी, संग्रामपूर ११७.८ मिमी, मेहकर १११ मिमी, चिखली १०९.८ मिमी, मोताळा १०६.७ मिमी, बुलढाणा १०४.८ मिमी, लोणार १०० मिमी, सिंदखेडराजा ९८.१ मिमी आणि देऊळगाव राजा ८२.५ मिमी पावसाची नोंद झाली. दोन तालुके वगळता तब्बल ११ तालुयांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.