नागपूर,
Indian Institute of Town Planners मूळची नागपूरची व एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे येथील संशोधक विद्यार्थिनी कृती शितल दोडके हिला नगररचना विषयावरील संशोधन प्रबंधासाठी राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय क्रमांक मिळाला आहे. हा सन्मान भारतीय नगररचनाकार संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखा, नागपूर यांच्या वतीने आयोजित संशोधन प्रबंध स्पर्धेत जाहीर करण्यात आला.
नागपूर मेट्रो मार्गिकेच्या परिसरातील जमिनीच्या मूल्यवाढीचा आणि शहरी विकासावरील परिणामाचा अभ्यास तिने आपल्या संशोधनातून मांडला आहे. तिच्या या यशाबद्दल विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
सौजन्य:अशोक माटे,संपर्क मित्र