नागपूर,
Inner Wheel Club इनर व्हील क्लब ऑफ नागपूर आणि लेट कमलताई दवंडे स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमात आषाढी एकादशीचे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांनी अभंग, श्लोक व समूहगीत सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शिक्षकांना तुळशीची रोपे भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी काळू यांनी, तर आभार प्रदर्शन अंशू शुक्ला यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. पूजा साओजी, मीना कुलकर्णी, डॉ. मीनल दवंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सौजन्य:मीनाक्षी देशपांडे ,संपर्क मित्र