शेतकर्‍यांची कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
बुलढाणा, 
List of farmers for loan waivers राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना—२०२६ अंतर्गत पात्र शेतकर्‍यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकर्‍यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध होणार असून पात्र शेतकर्‍यांना कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी अ‍ॅग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी कर्जमुक्ती योजना संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात तसेच ऑनलाईनव्दारे, जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, तालुका सहाय्यक निबंधक सहकार अधिकारी श्रेणी-१, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा समन्वयक, सर्व राष्ट्रीयकृत, ग्रामीण, खाजगी, सहकारी बँकेचे समन्वयक आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत राज्यातील पात्र शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
 
 
डा ४ ६
 
 
या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे २ लाख २७ हजार ६४६ शेतकर्‍यांना कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. आतापर्यंत १ लाख १६ हजार ४३६ पात्र शेतकर्‍यांची कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी ४९ हजार ०४७ शेतकर्‍यांचे ई-केवायसी पूर्ण झाली असून ६७ हजार ३८९ शेतकर्‍यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकर्‍यांनी अ‍ॅग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्येही प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रत्येक पात्र लाभार्थ्याच्या कर्ज खात्याला विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. त्याआधारे अ‍ॅग्रीस्टॅकवरील नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकर्‍यांना आपल्या पात्रतेबाबत अथवा योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात काही तक्रार अथवा शंका असेल, त्यांनी जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार नोंदवावी. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. शेतकर्‍यांनी काळजी करू नये, सर्व पात्र शेतकर्‍यांना योजनेचा लाभ मिळेल असे जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी सांगितले. विशेष सवलत (हेअर कट) : शेतकर्‍यांचे कर्जखाते अनुत्पादित (एनपीए) झाले असल्यास, नॅशनल बँकांना थकीत कालावधीच्या टप्प्यानुसार विशेष सवलत दिली जाणार आहे