पुरात वाहून गेलेला इसम पहाटे रेस्यू

एसडीआरएफ नागपूर व डीडीआरएफ वर्धा चमूची कामगिरी

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
अल्लीपूर, 
Man swept away in flood rescued at dawn अल्लीपूर ते टाकळी मार्गावरील यशोदा नदी पुलाजवळ पळसगाव येथील अक्षय माटे (३५) हे अचानक नाल्यावरून जात असताना पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते १५० ते २०० मीटर पर्यंत वाहून गेले. दरम्यान, एका मोठ्या झाडाचा आसरा घेऊन झाडावर चढून बसले. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच एसडीआरएफ नागपूर व डीडीआरएफ वर्धा चमूने घटनास्थळ गाठून पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांना सुखरूप बाहेर काढले. वर्धा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. गुरुवारी दुपारपासून सुरू झालेला पाऊस थांबून थांबून रात्रभर सुरूच होता. जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. अनेक मार्गही बंद झाले होते. अशातच अक्षय माटे हा इसम आजनसरा येथून देवळी तालुयातील पळसगाव येथे रात्री ८ वाजताच्या दरम्यान अल्लीपूर-टाकळी मार्गे दुचाकीने जात होता.
 
 
 

सरी
 
यशोदा नदीच्या काठी असलेल्या चिखल्या नाल्यावरून जात असतानाच पाण्याचा प्रवाह वाढल्याने दुचाकीसह वाहून गेला होता. तो घटनेच्या ठिकाणापासून जवळपास तीन किलोमीटर पर्यंत पाण्याच्या प्रवाहात वाहत गेला. त्याला पोहणे येत असल्याने त्याने एका झाडाला घट्ट पकडून तो तेथेच राहिला. घटनेची माहिती अल्लीपूर पोलिसांना मिळताच तात्काळ ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी घटनेची माहिती हिंगणघाटचे तहसीलदार व आपत्कालीन चमूला दिली. १२ ते १ वाजेपर्यंत ही चमू घटनास्थळी पोहोचली. मात्र, सतत पाऊस सुरू आणि पाणी पातळी वाढल्याने त्यांच्या हिंमतीने साथ सोडली. त्यानंतर एनडीआरएफच्या चमूला बोलावण्यात आले. एनडीआरएफच्या चमूने कसोशीने प्रयत्न केले. एनडीआरएफच्या चमूने पाण्यात बोट टाकून अक्षय माटे याला पहाटे ४ वाजता सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. एसडीआरएफ चमू नागपूर व डीडीआरएफ वर्धा चमूने हे रेस्यू ऑपरेशन राबविले. यावेळी हिंगणघाटचे तहसीलदार भलावी, अल्लीपूरचे ठाणेदार संगीता हेलोंडे, उपनिरीक्षक वर्षा तांदूळकर व पोलिस शिपाई उपस्थित होते.