शिष्यवृत्ती वाटप, ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संघटनेचे आयोजन

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
newspaper-vendors-welfare-association : वर्धा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संघामार्फत वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती वाटप, ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान सोहळा स्थानिक संत गाडगेबाबा सभागृह कृष्णनगर येथे आयोजित करण्यात आला होता.
 

J  
 
 
 
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर, उपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी, सुनील पारसे, बंडू मुळे आदी उपस्थित होते.
 
 
यावेळी पहिली ते पदवीपर्यंत ५० टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या ४६ विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देवून गौरव करण्यात आला. ५ कार्यकत्र्यांचा सेवा २६ वर्षे समर्पनाचे रौप्य महोत्सवी वर्षांत सहपत्नी नरेश व मंगला शेवडे, प्रकाश व कल्पना कठाने, रामभाऊ व सुनीता बोरकर, कैलाश व माधुरी चौहान, अनिल व मनीषा ठाकरे यांना गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
 
 
नगराध्यक्ष सुधीर पांगूळ म्हणाले, वृत्तपत्र विक्रेत्यांकरिता अनेक कल्याणकारी योजनेचा लाभ देणारी ही एकमेव संस्था असल्याचे प्रथमच आपल्या निदर्शनास आले.