अमरावती जिल्ह्यात पुरात अडकलेल्या १६ जणांना वाचवले

जिल्हा शोध व बचाव पथकाचा पुढाकार

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
अमरावती, 
People stranded in floods in Amravati जिल्ह्यात गेल्या ३६ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातल्या बेंबळा नदीच्या पुरातन नऊ जणांना तर राजुरा येथील मोकड नदीच्या पुरातून सात जणांना असे एकूण १६ जणांना जिल्हा शोध व बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे. या स्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा प यांनी पण घेतला होता. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संग्रामपूर गावाजवळील बेंबळा नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे आठ ते दहा इसम अडकल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षला ३० जुलैच्या रात्री ११ वाजताच्या दरम्यान मिळाली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशाने तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव पथक रात्री १२ वाजता घटनास्थळी पोहोचले व तात्काळ शोधकार्य सुरू करण्यात आले. पथकाने संग्रामपूर गावातील पुरामध्ये छतावर अडकलेले लोकांना बोटीच्या मदतीने बाहेर काढले. त्यात हनुमंत उके, रवी मेश्राम, सुभाष भोईर, सतीश मारभते, आशिष बोके, गौरव मारबले, ओम गिरी, अमोल भोयर, अनिकेत केवट याचा समावेश आहे. बचाव पथकात विशाल निमकर, कौस्तुभ वैद्य, पी. एस. गायकवाड,
 
 

amaravati 
 
 
गणेश कायदेकर, सुरज ठाकूर, दीपक भोईटे, मनीष उताणे, गोकुळ मुंडे यांचा समावेश होता. त्यांना पोलिस व महसूल प्रशासनाचे सहकार्य लाभले.दुसऱ्या एका घटनेत राजुर येथील मोखड नदीला आलेल्या पुरातून सात जणांना बाहेर काढण्यात यश आले. त्या दोन वर्षाच्या बाळाचाही समावेश आहे. साहेबराव जाधव, सावित्री जाधव, पुनम जाधव, जेतालाल जाधव, अनन्या जाधव, सोनम जाधव, रीना जाधव यांना बचाव पथकाने बाहेर काढले. जिल्हाधिकाऱ्यांना माहिती मिळत असताना हे पथक पाठविले होते. पथकला शोध घेत असताना खूप झाडझुडप व विषारी सापांचा सामना करावा लागला तसेच अंधार असल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप अडचणी येत होत्या. अथक प्रयत्न करून अवघ्या ३० मिनिटांमध्ये ७ जणांना बाहेर काढण्यात आले. बचाव पथकात सचिन धरमकर, आकाश निमकर, मुकेश सदाशिव, सचिन पवार, चैतन्य पोहाणे, प्रफुल भुसारी, अजय आसोले, तुळशीराम गोंडणे, भुषण काळे यांचा समावेश होता.