मत्स्यकन्या महिला मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी पुस्तकला मेश्राम यांची निवड

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
गोरेगाव,
pustakla meshram तालुक्यातील चोपा येथील मत्स्यकन्या महिला मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या., चोपा (रजिस्ट्रेशन क्र. 1031) या संस्थेच्या पदाधिकारी निवडीची सभा बुधवार, 29 जुलै रोजी उत्साहात पार पडली.
 

pustakla meshram elected president of matsyakanya women fisheries cooperative society 
सभा अध्यासी अधिकारी विलास अचरीत गणविर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सभेला संस्थेचे सर्व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी निवडीच्या प्रक्रियेत पुस्तकला कुवरलाल मेश्राम यांची संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल उपस्थित संचालकांनी त्यांचे अभिनंदन करत संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी कार्य होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी संस्थेच्या भविष्यातील विकास, मत्स्यव्यवसायाला चालना देणे तसेच महिला सदस्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
...