नागपूर,(रामटेक)
Shri Datta Meghe Foundation श्री दत्ता मेघे फाउंडेशन, नागपूर यांच्या वतीने रामटेक येथे नंदकिशोर जयस्वाल कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर सुरू करण्यात आले आहे. महाविद्यालयात बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी हा चार वर्षांचा व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम (कॉलेज कोड : 11331) उपलब्ध असून विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी शिक्षणाची नवी संधी मिळणार आहे.
महाविद्यालयात आधुनिक प्रयोगशाळा, प्रात्यक्षिक शेती, अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. तसेच कृषी अधिकारी, ॲग्री-बिझनेस, कृषी संशोधन, उद्योजकता आणि एम.एस्सी. (कृषी), आयसीएआर, एमपीएससी, यूपीएससी आदी उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षांसाठीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सौजन्य:भूषण चावरकर,संपर्क मित्र