नागपूर,
Shri Swami Samarth तुळशीबाग, महाल येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास केंद्रात गुरुपौर्णिमा (व्यासपौर्णिमा) भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी भगवान श्री स्वामी समर्थ यांच्या मूर्तीवर अभिषेक, रुद्राभिषेक, पवमान सूक्त पठण व भूपाळी आरती झाली.
यानंतर महा नैवेद्य आरती, 'परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ' या महामंत्राचा हवनात्मक जप आणि श्री स्वामी सारामृताचे सामुदायिक पठण करण्यात आले. सायंकाळी महाआरती, आध्यात्मिक मार्गदर्शन व प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवात सहभाग घेतला.
सौजन्य:मुकेश साळवे ,संपर्क मित्र