एसआयआरची कामे डोळ्यात तेल घालून पूर्ण करा : सोमय्या

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
kirit-somaiya : पक्षाची तांत्रिक बाजू अधिक मजबूत करून संघटन कार्यात वर्धा जिल्हा आघाडीवर ठेवण्यासाठी सर्व पदाधिकारी पूर्ण निष्ठेने काम करतील. पुढील ८ दिवस वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकत्र्यांनी डोळ्यात तेल घालून प्रत्येक बूथवर बीएलओ सोबत समन्वय साधून एकाही मतदाराचे नाव मतदार यादीतून सुटणार नाही, याची काळजी घ्यावी असे आवाहन भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे संयोजक किरीट सोमय्या यांनी केले.
 

SIR 
 
आनंद सागर सिटी येथे आज ३१ रोजी वर्धा जिल्हा एसआयर अभियानाची महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खासदार सुरेश वाघमारे आदींची उपस्थिती होती.
 
बैठकीमध्ये किरीट सोमय्या यांनी एसआयआर अभियानांतर्गत मतदार यादी सक्षमीकरण, तांत्रिक कामांची सुसूत्रता आणि बुथ स्तरावरील अचूक नियोजनावर मार्गदर्शन केले.
 
 
वर्धा जिल्ह्यातील सर्व विधानसभानिहाय व मंडळनिहाय एसआयआर कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पक्षाचे संघटन अगदी तळागाळापर्यंत, प्रत्येक बुथवर अधिक पारदर्शक आणि मजबूत करण्यासाठी आगामी काळातील कार्यपद्धती निश्चित करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष गाते यांनी एसआयआरचा अहवाल सोमय्या यांना सुपूर्द केला. आभार वर्धा विधानसभा प्रमुख निलेश पोहेकर यांनी मानले.