साऊथ अंबाझरी रोडवरील तुटलेली फांदी हटविण्याची मागणी

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
नागपूर,
South Ambazari Road साऊथ अंबाझरी रोडवरील समाजकल्याण विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत फुटपाथवर गेल्या २० ते २५ दिवसांपासून झाडाची मोठी फांदी पडून आहे.
 

amba  
 
या मार्गावर वाहनांची वर्दळ असून परिसरात दोन ते तीन शाळा तसेच अंध व दिव्यांग विद्यार्थ्यांची ये-जा होत असते. मात्र संबंधित फांदी अद्याप हटविण्यात आलेली नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने फांदी हटवून परिसर सुरक्षित करावा, अशी मागणी केली आहे.
सौजन्य : सुरेश चव्हारे,संपर्क मित्र