नागपूर
Sreesanth Pachalegaonkar Maharaj सोमलवाडा येथील श्रीसंत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रमात ‘संपूर्ण उपासना व भजन’ या पुस्तकाचे प्रकाशन भक्तिमय वातावरणात झाले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश एदलाबादकर, अध्यक्षस्थानी समीर खरे, तसेच नितीन तापस व अशोक तापस उपस्थित होते.
प्रकाश एदलाबादकर यांनी संतवाङ्मयाचे आध्यात्मिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त भक्तिगीतांचे सादरीकरणही करण्यात आले. कार्यक्रमाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन रेणुका करंदीकर यांनी, तर आभार अमित गोरे यांनी मानले.
सौजन्य:देवराव प्रधान,संपर्क मित्र