बेरोजगारी समस्यातून मुक्त करण्यासाठी स्वदेशी समर्थक अभियान

प्रांत संयोजक शिवाजी भालतिलक

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
बुलढाणा,
swadeshi self-reliant india आत्मनिर्भर भारत ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून आचरण्यात आणण्यासाठी युवकांना स्वावलंबी जिवन जगण्याची प्रेरणा देण्याच्या उद्देशाने तसेच तरूणांना भेडसावणार्‍या बेरोजगारी समस्या सोडविण्यासाठी स्वभाषा, स्वभूषा, स्वचरण, स्वउद्योग या संकल्पसाठी मैभी स्वदेशी समर्थक हे अभियान दि. १ ऑगस्ट लोकमान्य टिळक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती पासून २० ऑगस्ट पर्यंत अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती स्वदेशी स्वावलंबी भारत अभियान प्रांत संयोजक शिवाजी भालतिलक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
 

swadeshi self-reliant india campaign launched to tackle unemployment among youth 
येथील पत्रकार भवन येथे दि. ३१ जुलै रोजी अभियांनाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे अयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर अभियानाचे समन्वयक मार्गदर्शक प्रा. विजयराव जोशी, संरक्षक उद्योज अजय भारती, नगर संयोजक संतोष व्यवहारे प्रामुख्याने उपस्थित हाते. प्रारंभी दै. तरूण भारतचे माजी मुख्य संपादक स्व. लक्ष्मणराव जोशी यांना अभियानाच्या वतीने दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धाजंली अर्पण करण्यात अली. अभियानाची माहिती देतांना प्रांत संयोजक शिवाजी भालतिलक यांनी सांगितले स्वदेशी हा भाव वस्तू खरेदी पर्यंत मार्यादीत नसून वास्तविक त्यामध्ये देशाची अस्मिता, राष्ट्रप्रेमाची भावना आपल्या आचरणातून भविष्यातील आत्मनिर्भर स्वावलंबी भारत निर्माण करण्याचे स्वप्न साकरल्या जाणार आहे. त्यासाठी दि. १ ऑगस्ट पासून स्वदेशी स्वावलंबी भारत अभियान स्वदेशी जागरण मंचच्या वतीने संकल्प पत्र भरून युवकांना स्वावलंबी जिवन जगण्याची प्रेरणा मिळणार आहे. या अभियानात सर्व क्षेत्रातील नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक सुत्रसंचलन प्रा. विजयराव जोशी, आभार उद्योजक संरक्षक अजय भारती यांनी मानले.