रंगलाल केजडीवाल यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण

गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार

    दिनांक :31-Jul-2026
Total Views |
पुलगाव, 
ranglal-kejriwals-birth-anniversary : शिक्षण महर्षी स्व. रंगलाल केजडीवाल यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक रंगलाल केजडीवाल हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय आणि आर. के. ज्ञान मंदिरम ट्रस्टतर्फे शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आलेे.
 
 
JK
 
 
 
अध्यक्षस्थानी माजी विश्वस्त द्बारकादास दरक होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळा समितीचे अध्यक्ष रंजनकुमार केजडीवाल, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, आमदार ॲड. अभिजित वंजारी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वंदना कारखेले उपस्थित होते.
 
आ. अडबाले म्हणाले, समाजसेवेचे सर्वात उत्तम माध्यम कोणते असेल तर ते म्हणजे शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करणे होय. केजडीवाल परिवाराने ७० वर्षांपासून पुलगावसारख्या छोट्या गावात उत्तम शिक्षणाची व्यवस्था यशस्वीपणे चालवली आहे, ही गोष्ट नक्कीच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
आ. अभिजित वंजारी यांनी, देशकार्यासाठी सदैव तत्पर असावे असा संदेश दिला. यावेळी इतर मान्यवरांनीही विचार व्यक्त केले.
संचालन प्रियदर्शनी उमरे तर आभार प्रदर्शन मनीषा रवाळे यांनी केले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक माया वंडलकर, उपमुख्याध्यापक नीलिमा घिनमिने, ज्ञान मंदिरमचे प्राचार्य नितीन श्रीवास, उपप्राचार्य भोयर, पर्यवेक्षक गणेश शर्मा, सुबोध चचाणे, जितेंद्र वर्मा यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालकांची उपस्थिती होती.