तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
yavatmal-news : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा, क्रांतीवीर शामादादा कोलाम संघटना यवतमाळच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीवीर आदिवासी जननायक शामादादा कोलाम यांच्या 27 व्या पुण्यतिथीनिमित्त आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दत्तापूर (निरंजन माहूर), ता. कळंब येथे होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड राहणार आहे. आदिवासी विकासमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास लोकसभा सदस्य, विधानपरिषद व विधानसभा सदस्य, जिल्हाधिकारी, आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस प्रशासनातील अधिकारी तसेच विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
कार्यक्रमामध्ये आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक परंपरेच जतन, लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य. हस्तकला, खाद्यसंस्कृती, रानभाजी महोत्सव, सामाजिक व सांस्कृतिक वारसा यांचे लोकदर्शन घडविण्यात येणार आहे. तसेच कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे व विविध शासकीय योजनांची माहिती व लाभार्थी मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांना लाभ देण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पांढरकवडा यांनी सर्व नागरिक, लोकप्रनिनिधी, सामाजिक संस्था व आदिवासी बांधधांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.