अनिल कांबळे,
नागपूर,
guru-purnima : "हीच आमुची प्रार्थना" या प्रेरणादायी प्रार्थनेने विघ्नहर्ता योगनृत्य परिवाराच्या गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने आयोजित कार्यक्रम मंगलमय संपन्न झाला.

यावेळी विघ्नहर्ता योगनृत्य परिवाराचे संस्थापक आणि मुख्य प्रशिक्षक डॉ. बबनराव गांजरे, सहप्रशिक्षक महादेव तोंडरे आणि अरुण राऊत यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी अनिल खुटाफळे यांनी गुरूंचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व प्रभावीपणे विशद केले. त्यानंतर सर्व सदस्यांनी आपल्या गुरुजनांना भेटवस्तू, रोपटे आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. लक्ष्मण बालपांडे, संध्या बालपांडे, निशिकांत मामीडवार, विनोद लुटे यांनी प्रशिक्षकांचे पुष्पगुच्छ आणि रोपटे देऊन स्वागत केले. यावेळी मुख्य प्रशिक्षक डॉ. बबनराव गांजरे यांनी आपल्या शिष्यांना मोलाचे मार्गदर्शन करत ‘पहिला गुरु–आई, दुसरा गुरु–वडील आणि तिसरा गुरु–पर्यावरण यांचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व समजावून सांगितले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित सर्वांना जीवनात योग्य दिशा आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली. कार्यक्रमाचा समारोप अरुण राऊत आणि महादेव तोंडरे यांच्या मार्गदर्शनाने अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.