वाशीम,
heavy rainfall महिनाभर दडी मारून बसलेल्या वरुणराजाने अखेर ३० जुलै रोजी दमदार पुनरागमन करत जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले. दिवसभर झालेला मुसळधार पाऊस रात्रीभरही कायम राहिल्याने जिल्ह्यात सर्वत्र जलसंचय झाला. ३१ जुलैच्या सकाळपर्यंत जिल्ह्यातील ४६ पैकी तब्बल ४३ महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. पावसाअभावी संकटात सापडलेल्या खरीप पिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हा प्रशासनाच्या पर्जन्यमान अहवालानुसार, ३१ जुलै रोजी सकाळपर्यंत जुलै महिन्यात जिल्ह्यात २७७ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली असून, हे सरासरीच्या ११३.७ टक्के आहे. तालुकानिहाय मानोरा येथे सर्वाधिक ३३१.५ मि.मी., त्यापाठोपाठ मालेगाव ३२९.९ मि.मी., वाशीम २८१.९ मि.मी., रिसोड २५२ मि.मी., मंगरूळनाथ २४३.५ मि.मी. आणि कारंजा २२९.५ मि.मी. पाऊस नोंदविण्यात आला. ३१ जुलैच्या सकाळी संपलेल्या २४ तासांत ६५ मि. मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद ४३ महसुली मंडळांमध्ये झाली. वाशीम, रिसोड, मालेगाव, मंगरूळनाथ, मानोरा आणि कारंजा या सर्व तालुयातील बहुतांश महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने जिल्हाभर पावसाचा प्रभाव एकसमान दिसून आला. वाशीम तालुयातील ९ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. रिसोड तालुयातील ८, मालेगाव तालुयातील ८, मंगरुळनाथ तालुयातील ७, मानोरा तालुयातील ६, कारंजा तालुयातील ५ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.
मुसळधार पावसामुळे अडोळी ते जुमडा मार्गावर झाड उन्मळून पडल्याने तसेच वीजवाहिनी तुटून रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. याशिवाय कोकलगाव ते सुरजखेडा मार्गावरील पुलावरून पुराचे पाणी वाहिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.
बोरव्हा ते रोहणा रस्त्यावरील गावनाल्याला आलेल्या पुरामुळे रस्त्याचा मोठा भाग वाहून गेला. त्यामुळे दोन्ही गावांतील संपर्क तात्पुरता तुटला. सततच्या अतिवृष्टीमुळे वाघळूद ते हिवरा रस्ता वाहून गेला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे जायखेड गावाकडे जाणारा मुख्य रस्ता बंद झाल्याने गावाचा संपर्क काही काळासाठी विस्कळीत झाला. मंगरुळनाथ तालुयातील पार्डी आसरा येथून आसेगावकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली. रिसोड तालुयातील खडकी ढंगारे ते रिठद मार्गावर पाणी आल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वाहतूक बंद होती. रिसोड तालुयातील गोभणी व करडा गावादरम्यान पैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहिल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. मानका गावातील पूल अतिवृष्टीमुळे खचल्याने गावाचा संपर्क प्रभावित झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. पार्डी तिखे ते आसेगाव रस्त्यावरील पुलावरून पुराचे पाणी वाहिल्यानंतर पुलाचा काही भाग खचला. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून तातडीने दुरुस्तीची आवश्यकता निर्माण झाली आहे.
३१ जुलै रोजी दिवसभर पावसाने उघाड दिली असली तरी आकाशात ढग कायम असल्याने आणखी मुसळधार पाऊस येणार्याची शयता हवामान खात्याने वर्तविली आहे. जून महिन्यात पडलेल्या रिमझीम पावसावर शेतकर्यांनी पेरण्या आटोपल्या. बीजांकूर जमीनीवर आले आणि पावसाने दांडी मारली. जमीनीवर आलेले अंकुर कोमजू लागले. काही शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली. मुसळधार पाऊस झाला नसल्यामुळे सिंचन प्रकल्पातील जलसाठा चिंताजनक होता. पाणी टंचाईचे संकटही घोंगावत होते. त्यामुळे शेतकर्यासह सिंचन प्रकल्पांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती. जुलै अखेर वरुणराजा प्रसन्न झाला आणि जिल्ह्यात सर्वत्र धो...धो.... बरसला.
३० जुलै ला पडलेला सरासरी पाऊस
पर्जन्यमापक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार वाशीम जिल्ह्यात ३० जुलै रोजी सरासरी ११०.०९ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात वाशीम तालुयात १२१.०२ मि.मी., रिसोड तालुयात ९६.०४, मालेगाव तालुयात १४०.०५ मि.मी, मानोरा तालुयात ११६.०३ मि.मी., कारंजा तालुयात ७६.०३ मि.मी. पाऊस पडला. बहुप्रतीक्षेनंतर वरुणराजाने दमदार हजेरी लावल्याने सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली असून, शेतकरी सुखावला.
.