हिंगणघाट
hinganghat विधान परिषदेचे माजी आमदार स्व. रामदास आंबटकर यांच्या जयंतीनिमित्त शिवराय गार्डन योग कक्ष व माजी बांधकाम सभापती छाया सातपुते यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नपच्या पाणीपुरवठा सभापती रवीला आखाडे व नगरसेविका प्राची पाचखेडे, अभिनव विचार मंचाचे अध्यक्ष नितीन सुकळकर, राजेंद्र मोघे, जयंत देवढे उपस्थित होते.

hinganghat यावेळी सुकळकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी घडलेले, अभा विद्यार्थी परिषदेचे काम अखंड व अविरत वाहून घेत विचारधारेशी एकनिष्ठ राहून अखंड सेवा करणारे डॉ. रामदास आंबटकर यांनी समाजाच्या प्रत्येक स्तरासाठी निःस्वार्थपणे काम केले. त्यांचा राजकीय प्रवास हा केवळ पदांसाठी नव्हता तर समाजासाठी सकारात्मक बदल घडवण्यासाठी होता. आमदार म्हणून त्यांनी आपल्या जबाबदार्यांचे प्रामाणिकपणे पालन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडला. त्यांची शांत, समंजस आणि संवेदनशील कार्यशैली आजही कार्यकत्र्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. ते केवळ एक राजकीय नेते नव्हते तर मार्गदर्शक, विचारवंत आणि लोकांशी नातं जपणारे अत्यंत आपुलकीचे व्यक्तिमत्त्व होते, असे ते म्हणाले.
hinganghat याप्रसंगी सभापती रवीला आखाडे व नगरसेवक प्राची पाचखेडे यांनी स्व. डॉ आंबटकर यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांना उजाळा दिला. यावेळी शिवराय गार्डन योग कक्षातील योगसाधिकांनी वड, पिंपळ, आंबा, कडूलिंब व सिसम यांसारख्या पर्यावरणपूरक व उपयुक्त वृक्षांची लागवड केली. वृक्षारोपणाबरोबरच त्यांच्या संवर्धनाची जबाबदारीही योगसाधिकांनी स्वीकारली. प्रास्ताविक छाया सातपुते यांनी केले तर संचालन निता दरवरे यांनी केले.