वर्धा
tree-plantation-drive आलोडी परिसरात शुक्रवार ३ रोजी वनविभागाच्या पुढाकाराने १० हजार वृक्षारोपन करण्यात आले. शुक्रवारी एकाच दिवशी ४ हजार ४४४ रोपं लावण्याचा विक्रमही झाला.
वनविभागाच्या पुढाकाराने वनमहोत्सवाचे औचित्य साधून आलोडी परिसरातील सर्वे ७१ या ९ हेक्टर पैकी ४ हेक्टर क्षेत्रावर आवळा, कडूनिम, उंबर, सीताफळ, जांब, पापडा, सिसू आदी प्रजातींच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली.
tree-plantation-drive या वृक्ष लागवड कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपवनसंरक्षक हरविर सिंग, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी सुहास बढेकर, सहायक वनसंरक्षक हरिलाल सरोदे, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, साटोडाचे सरपंच गौरव गावंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी यांची उपस्थिती होती. या उपक्रमात न्यू आर्ट, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजच्या विद्याथ्र्यांनी सहभाग नोंदवत श्रमदान करून रोपटे लावली.
tree-plantation-drive वृक्ष लागवड उपक्रमात साटोडा आणि आलोडी येथील ग्रामस्थांनीही सहभाग नोंदवत वृक्ष लागवड केली.