नागपूर,
Lions Club of Nagpur पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लायन्स क्लब ऑफ नागपूर मेट्रोपॉलिटन आणि मा इरा हीलिंग्स यांच्या संयुक्त विद्यमाने 'एक पेड माँ के नाम' उपक्रमांतर्गत १००० वृक्ष लागवड मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. सीताबर्डी येथील मातृ सेवा संघ परिसरात २५ वृक्षांचे रोपण करून अभियानाचा शुभारंभ झाला.
कार्यक्रमाला प्राचार्या मृणालिनी देशमुख, पीडीजी चंद्रकांत सोंटक्के, क्लबचे अध्यक्ष दिलीप कुकडे तसेच मा इरा हीलिंग्सच्या संस्थापक लायन पियू लाहोरी यांची प्रमुख उपस्थिती होती. Lions Club of Nagpur रश्मी भिडे, सारंग खोडे, दीपक देशमुख आणि प्रतीक देशमुख यांनीही वृक्षारोपणात सहभाग घेतला.यावेळी लायन पियू लाहोरी यांनी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. पुढील काही महिन्यांत शहरातील शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था व सार्वजनिक ठिकाणी एकूण १००० वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
सौजन्य:पियू लाहोरी,संपर्क मित्र