ब्राह्मण सेवा मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Brahmin Seva Mandal ब्राह्मण सेवा मंडळ, नागपूरतर्फे दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तात्या टोपे हॉल येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला पीएमजी सोसायटीचे अध्यक्ष तथा समाजसेवक सुनील बोक्षे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 
ty
 
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष मिलिंद निमदेव होते. प्रारंभी सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अवधूत देशमुख (९९.४ पर्सेंटाइल) तसेच नागपूर विभागात द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या आणि संस्कृत विषयात १०० टक्के गुण मिळविणाऱ्या अल्हाद मुंशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय एकूण २८ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. संस्कृत विषयात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांनाही पुरस्कार देण्यात आले. संस्कृत विषयात डॉक्टरेट प्राप्त केल्याबद्दल अभिजीत बोरीकर यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी मिलिंद निमदेव यांनी मंडळाच्या कार्याची माहिती देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले,Brahmin Seva Mandal तर सुनील बोक्षे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत ब्राह्मण सेवा मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन श्वेता गर्गे यांनी केले. सचिव हेमंत पडळकर यांनी प्रास्ताविक, तर आनंद बडे यांनी आभार प्रदर्शन केले.
सौजन्य :दिनेश टेकाडे,संपर्क मित्र