मियामी,
argentina defeats cape verde फिफा विश्वचषकात अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या अंतिम-३२ फेरीच्या सामन्यात विश्वविजेत्या अर्जेंटिनाने केप वर्देवर ३-२ असा रोमहर्षक विजय नोंदविला आणि स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
अनेक उतार-चढावांनी रंगलेल्या या १२० मिनिटांच्या खेळात केप वर्देने विद्यमान विजेत्या अर्जेंटिनाला ऐतिहासिक धक्का देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांनी अर्जेंटिनाला खेळाच्या इतिहासातील एका मोठ्या धक्क्याच्या अगदी उंबरठ्यावर आणून ठेवले होते, परंतु अर्जेंंटिना संघाने आपले अनुभव पणाला लावून विजय खेचून आणला आणि चाहत्यांची मने जिंकली, पण त्याआधी केप वर्देने आमच्यातही विश्वविजेत्या संघाला हरवून दाखविण्याची ताकद, जिद्द आणि कौशल्य आहे, हे दाखवून दिले. मेस्सी व केप वर्देचा गोलरक्षक वोजिन्हा यांच्यातील आमनेसामनेच्या प्रसंगांपासून ते अतिरिक्त वेळेच्या उत्तरार्धात केप वर्देने केलेल्या दुसऱ्या बरोबरीच्या गोलपर्यंतचा थरार रोमांचक होता.
सामना संपल्याची शिट्टी वाजताच अर्जेंटिनाचे खेळाडू गुडघ्यावर बसले, तर प्रेक्षागृहात सुटकेचा नि:श्वास, आनंद आणि नेहमीचा तो 'भक्तीभावाने' साजरा केला जाणारा जल्लोष पुन्हा एकदा पाहायला मिळाला. ३-२ अशा विजयामुळे आता अर्जेंटिनाचा अंतिम-१६ फेरीचा सामना अटलांटा येथे इजिप्तशी होणार आहे.
पण केप वर्देचा संघ अजूनही हार मानण्यास तयार नव्हता. त्यांनी आक्रमक खेळ केला आणि लागोपाठ तीन कॉर्नर मिळविले. आणि १०२ व्या मिनिटाला सिडनी लोपेस कॅब्रालने आपल्या अद्भुत कौशल्याच्या जोरावर स्कोअर २-२ असा बरोबरीचा केला. तो गोल विश्वचषकातील महान क्षणांपैकी एक वाटला – ज्यामध्ये १९८६ मधील जोसिमार आणि १९९० मधील फ्रँकोइस ओमाम-बियिक यांच्या खेळाची झलक पाहायला मिळाली.
सामन्याच्या २९ व्या मिनिटाला अपेक्षेनुसार लिओनेल मेस्सीने गोलरक्षक वोजिन्हाला हुलकावणी देत गोल केला व अर्जेंटिनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली, मध्यंतरानंतर ५९ व्या मिनिटाला डेरॉय दुआर्तेने गोल करून केप वर्देला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. अतिरिक्त वेळेत लिसांड्रो मार्टिनेझने ९२ व्या मिनिटाला गोल करून पुन्हा अर्जेंटिनाला २-१ असे आघाडीवर आणले, परंतु सिडनी सोपेझ कॅब्रिएलने १०३ व्या मिनिटाला गोल करून केप वर्देला २-२ अशी बरोबरी मिळवून दिली. मात्र अखेरच्या क्षणी अर्जेंटिनाला डिनेने १११ व्या मिनिटाला आत्मघाती गोल केला व अर्जेंटिनाचा ३-२ असा विजय निश्चित केला.
मेस्सीचा नवीन ऐतिहासिक विक्रम
मियामी : फिफा विश्वचषकात केप वर्देविरुद्ध अर्जेंटिनाने ३-२ अशा फरकाने (अतिरिक्त वेळेत) मिळविलेल्या रोमांचक विजयादरम्यान लिओनेल मेस्सीने अनेक ऐतिहासिक विक्रम मोडीत काढले. मियामीमध्ये झालेल्या या सामन्यातील मेस्सीच्या अविश्वसनीय कामगिरीत २९ व्या मिनिटाला त्याने केलेले सुरुवातीचे गोल महत्त्वपूर्ण ठरले आणि त्याद्वारे त्याने काही प्रमुख टप्पे
सर्वाधिक गोल करणारा खेळाडू : हा गोल त्याच्या कारकिर्दीतील २० वा फिफा विश्वचषक गोल ठरला. त्यामुळे या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचा त्याचा विक्रम अधिक भक्कम झाला.
सलग गोल करण्याची मालिका : सलग आठ विश्वचषक सामन्यांमध्ये गोल करणारा तो इतिहासातील पहिला खेळाडू ठरला.
३० विश्वचषक सामने : मैदानात उतरताच, ३० विश्वचषक सामने खेळणारा तो इतिहासातील पहिला पुरुष खेळाडू झाला.
बाद फेरीत वर्चस्व: स्पर्धेच्या इतिहासात सलग पाच विश्वचषक बाद फेरीच्या सामन्यांमध्ये गोल करणारा तो पहिला खेळाडू ठरला.
गोलमधील सहभाग : विश्वचषकात गोलमधील सहभागाचा (गोल किंवा असिस्ट) त्याने १२ वा टप्पा गाठला.
मेस्सी 'गोल्डन बूट'च्या शर्यतीत आघाडीवर
लिओनेल मेस्सी ७ गोलसह २०२६ फिफा विश्वचषक 'गोल्डन बूट'च्या शर्यतीत आघाडीवर आहे, तर कियालियन एमबाप्पे ६ गोलसह त्याच्या अगदी जवळ आहे.
'ॲडिडास गोल्डन बूट'च्या शर्यतीतील सर्वाधिक गोल करणारे खेळाडू आणि प्रमुख दावेदार खालीलप्रमाणे आहेत : लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना)– ७ गोल, कियालियन एमबाप्पे (फ्रान्स) – ६ गोल, अर्लिंग हालंड (नॉर्वे)– ५ गोल, हॅरी केन (इंग्लंड)– ५ गोल, उस्मान डेम्बेले (फ्रान्स)– ४ गोल, विनिसिअस ज्युनियर (ब्राझील) – ४ गोल.