मेहेर बाबांच्या मौनधारणेला १०१ वर्षे

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Avatar Meher Baba अवतार मेहेर बाबांनी १० जुलै १९२५ रोजी विश्वकल्याणासाठी मौन धारण केले होते. ३१ जानेवारी १९६९ रोजी देहत्याग करेपर्यंत त्यांनी तब्बल ४४ वर्षे मौन पाळले. त्यांच्या या मौनधारणेच्या स्मरणार्थ दरवर्षी १० जुलै रोजी जगभरातील मेहेर बाबा प्रेमी ‘मौन दिन’ साजरा करतात.

23 
 
 
यंदाही ९ जुलैच्या मध्यरात्रीपासून १० जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत मेहेर बाबा प्रेमी मौन पाळून त्यांना अभिवादन करणार आहेत. मेहेर बाबांनी प्रेम, समर्पण आणि ईश्वरभक्तीचा संदेश आपल्या आचरणातून दिला. शब्दांपेक्षा निःस्वार्थ प्रेम आणि अंतर्मनातील मौनातूनच ईश्वराशी एकरूप होता येते,Avatar Meher Baba असा त्यांचा संदेश होता.नागपूरातील मेहेर बाबा प्रेमी दर रविवारी सायंकाळी ५ ते ७.३० या वेळेत धरमपेठ येथील मेहेर शेल्टरमध्ये साप्ताहिक सत्संगाचे आयोजन करतात. यानिमित्त सर्व भाविकांना मौन दिनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सौजन्य :मेहरा टोळ,संपर्क मित्र