कर्तनकारांच्या हातात दिली सेवेची किट

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
वर्धा,
avinash dev सारथी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अविनाश देव यांनी आपल्या वाढदिवसाला सामाजिक सेवेची जोड देत पिपरी (मेघे) परिसरातील कर्तनकारांचा अनोख्या पद्धतीने सन्मान केला. जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिपरी (मेघे) सर्कलमधील तब्बल ४२ कर्तनालयांना भेट देत त्यांच्या व्यवसायासाठी उपयुक्त साहित्याच्या किटचे वितरण करण्यात आले. तसेच पिपरी परिसरातील महिला भजन मंडळांना भजनाचे साहित्यही भेट देण्यात आले
 

avinash dev .
समाजातील प्रत्येक घटकाचे आपापल्या परीने महत्त्वाचे योगदान असते. कर्तनकारही आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून वर्षानुवर्षे समाजाची सेवा करीत आहेत. त्यांच्या या सेवेची दखल घेत अविनाश देव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उपयोगी ठरणार्या साहित्याचे किट भेट देण्यात आले. पिपरी (मेघे) सर्कलमधील कर्तनालयांना भेटी देऊन साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी त्यांच्या समस्याही avinash dev  जाणून घेतल्या.या सामाजिक उपक्रमात अविनाश देव यांच्यासह रवी शेंडे, अनिकेत भोयर, विशाल चौधरी आणि वैभव अंबूलकर सहभागी झाले होते. याच उपक्रमाचा भाग म्हणून पिपरी (मेघे) परिसरातील महिला भजन मंडळालाही भजनासाठी आवश्यक साहित्य भेट देण्यात आले.
वाढदिवसाचा उत्सव केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील कष्टकरी आणि सेवाभावी घटकांपर्यंत आनंद पोहोचविण्याच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.