अयान ‘सीए फाउंडेशन ऑल इंडिया रँक’मध्ये द्वितीय

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
भद्रावती
ca-foundation-exam सीए फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील अयान अब्बास अली अजानी याने देशपातळीवर द्वितीय स्थानी आहे.

ayan 
 
 ca-foundation-exam अयान याने सीए फाउंडेशन परीक्षेत 400 पैकी 367 गुण (91.75 टक्के) मिळवत देशात द्वितीय क्रमांक पटकावला. यापूर्वीही त्याने दहावीमध्ये 98.6 टक्के आणि बारावीमध्ये 99.8 टक्के गुण मिळवले होते. विशेष म्हणजे, अयानने कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार न घेता अभ्यास, सातत्यपूर्ण परिश्रम आणि आई-वडिलांच्या मार्गदर्शनाच्या बळावर हे यश संपादन केले. नियमित अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि आत्मविश्वास यामुळेच हे यश शक्य झाल्याचे अयानने सांगितले. अयानच्या या दैदिप्यमान यशामुळे भद्रावतीसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबीय, शिक्षक, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
 
ca-foundation-exam या परिक्षेत देशभरातील एकूण 98 हजार 217 सहभागी विद्यार्थ्यांमधून केवळ 18 हजार 124 विद्यार्थी पात्र ठरू शकले. पात्र विद्यार्थ्यांची टक्केवारी 20.09 आहे. सिए फाउंडेशनच्या ऑल इंडिया रँकमध्ये यंदा महाराष्ट्राचा दबदबा पाहायला मिळाला. प्रथम क्रमांक नाशिकच्या साक्षी जैन हिने 371 गुण (92.75 टक्के), द्वितीय क्रमांक भद्रावतीच्या अयान अब्बास अली अजानीने 367 गुण (91.75 टक्के), तर तृतीय क्रमांक राधा रमेश मुळे हिने 365 गुण (91.25 टक्के) मिळवत पटकावले. अयान आता सीए इंटरमिजिएट परीक्षेच्या तयारीला लागला असून, यशस्वी चार्टर्ड अकाउंटंट बनून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देण्याचे त्याचे ध्येय असल्याचे त्याने आवर्जून सांगितले.