2023 मध्ये विदर्भातील चंद्रपूर पाऊस दुसर्‍या क्रमांकावर

2013 च्या जुलै महिन्याचा शतकातील सर्वाधिक पाऊस गोंदियात

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
चंद्रपूर
rainfall vidarbha गेल्या शतकात जुलै महिन्यात, विदर्भात सर्वाधिक पाऊस गोंदिया येथे 2013 साली 936.2 मिमी एवढा झाला होता. तर चंद्रपूर येथे जुलै महिन्यात 2023 साली विदर्भात दुसर्‍या क्रमांकावर 905.4 मिमी पाऊस पडला. 22 जुलै 2023 मध्ये 24 तासात सर्वाधिक पाऊस यवतमाळ येथे 316 मिमी झाला. तर नागपूर येथे 12 जुलै 1994 रोजी 304 मिमी पडला, अशी महिती हवामान अभ्यासक सुरेश चोपणे यांनी दिली.
 
rainfall
 
 
rainfall vidarbha  गोंदिया जिल्ह्यात 2013 मध्ये 936.2 मिमी पाऊस आला. तर 7 जुलै 1992 ला 24 तासात 198.2 मिमी पाऊस झाला. चंद्रपूर जिल्ह्यात 2023 मध्ये 905.4 मिमी पाऊस झाला. तर 19 जुलै 2023 मध्ये 24 तासात 242 मिमी पावसाची नोंद झाली. वर्धा जिल्ह्यात 2022 च्या जुलै मध्ये 876.4 मिमी पाऊस झाला. तर जुलै 1994 मध्ये 24 तासात 266.4.13 मिमी पाऊस पडला. यवतमाळ जिल्ह्यात जुलै 2023 मध्ये 700.4 मिमी, तर 22 जुलै 2023 मध्ये 24 तासात 316.1 मिमी पावसाची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात 1994 मध्ये 678.9 मिमी पाऊस जुलै महिन्यात पडला. तर 12 जुलै 1994 मध्ये या जिल्ह्यात 304.0 मिमी पावसाची नोंद झाली.
 
 rainfall vidarbha  जुलै महिन्यात, अकोला जिल्ह्यात 1883 मध्ये 546.6 मिमी, तर 18 जुलै 1986 मध्ये 24 तासात 255.0 मिमी पाऊस झाला. बुलढाणा जिल्ह्यात 1916 मध्ये 534.4 मिमी, तर 8 जुलै 2011 मध्ये 24 तासात 166 मिमी पाऊस आला. तर अमरावती जिल्ह्यात 1946 मध्ये 473.7 मिमी पाऊस पडला, तर 13 जुलै 1888 मध्ये 24 तासात 230.1 मिमी पावसाची नोंद झाली, अशी आकडेवारी चोपणे यांनी दिली.