'अर्जिंक्य योद्धा' ग्रंथाचे प्रकाशन रविवारी

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
नागपूर,
Chief Minister Devendra Fadnavis महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासावर आधारित 'अजिंक्य योद्धा' या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवारी (५ जुलै) सायंकाळी ६ वाजता एम्प्रेस मिल परिसरातील नक्षत्र मेजवानी सभागृहात होणार आहे. याबाबतची माहिती पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

devrav 
 
 
 
साई ज्योती प्रकाशनतर्फे आयोजित या सोहळ्याला नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.पत्रकार परिषदेत ज्येष्ठ पत्रकारअविनाश पाठक, Chief Minister Devendra Fadnavis  ग्रंथाचे लेखक अरुण कणेरे आणि प्रकाशक गणेश राऊत यांनी ग्रंथनिर्मितीमागील प्रेरणा, संशोधन प्रक्रिया आणि वैशिष्ट्यांची माहिती दिली.अजिंक्य योद्धा' या ग्रंथात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालपणापासून विद्यार्थी जीवन, नागपूर महापालिकेतील नगरसेवक व महापौर म्हणून केलेले कार्य, आमदार म्हणून उभारलेली आंदोलने, मुख्यमंत्री म्हणून घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, विकासकामे तसेच त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय नेतृत्वाचा संशोधनाधारित आढावा घेण्यात आला आहे.यावेळी डॉ. अमित सिंगरू, राहुल दुम्पलवार, विरसिंगजी आणि सचिन दुम्पलवार उपस्थित होते.
सौजन्य:देवराव प्रधान,संपर्क मित्र