चिकाटीचे उदाहरण म्हणजे क्रिकेटपटू सौरभ दुबे : पं. अग्निहोत्री

अग्निहोत्री टर्फ प्रीमियर लीगचे बक्षीस वितरण

    दिनांक :04-Jul-2026
Total Views |
वर्धा,
shankarprasad agnihotri क्रिकेट हा केवळ प्रतिभेचा नव्हे तर अथक परिश्रम, संयम आणि चिकाटीचा खेळ आहे. या गुणांचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे क्रिकेटपटू सौरभ दुबे! विदर्भातील वर्धा या छोट्या शहरातून पुढे आलेल्या सौरभ दुबे यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चढ-उतारांचा सामना केला. अनेक वेळा संधी मिळाली नाही. आयपीएलच्या संघात निवड होऊनही खेळण्याची संधी हुकली. मात्र हार न मानता स्वतःच्या खेळात सुधारणा सुरू ठेवली. जिद्दीमुळे त्यांना परत खेळण्याची संधी मिळाली. दुबे कठोर परिश्रम आणि अविरत चिकाटीचे मूर्तीमंत उदाहरण आहे असे मत जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी व्यक्त केले.
 

cricketer saurabh dube is a symbol of perseverance says pt shankarprasad agnihotri at wardha cricket league 
जय महाकाली शिक्षण संस्था तर्फे आयोजित अग्निहोत्री टर्फ प्रीमियर लीगचे बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री, प्रमुख पाहुणे क्रिकेटर सौरभ दुबे, लायन्स क्लब गांधी सिटीचे संचालक अनिल नरेडी, वर्धा कला महोत्सवचे अध्यक्ष संदीप चिचाटे, डॉ. अशोक जैन, सहसंयोजक चंद्रकांत कोठारे, अभिजित रघुवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या तीन दिवसीय क्रिकेट लीग मध्ये १८ संघानी सहभाग घेतला होता. चॅलेंजर व स्पार्टम या संघामध्ये अंतिम सामना खेळण्यात आला. त्यामध्ये स्पार्टम संघ चॅम्पियन ठरला. स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता शौर्य अग्निहोत्री यानी परिश्रम घेतले. क्रिकेटपटू सौरभ दुबे, संदीप चिचाटे, अनिल नरेडी यांनी कौतुक केले.