सिंदी (रेल्वे)
farm-dispute शेताच्या ताब्यावरून सुरू असलेल्या वादातून चेतन बोकडे (३८) याला बेदम मारहाण केल्याची घटना सेलू तालुक्यातील मौजा हेलोडी शिवार येथे घडली. याप्रकरणी दहेगाव (गोसावी) पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
farm-dispute मिळालेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास चेतन बोकडे शेतातील पिकाची पाहणी करत होता. दरम्यान, प्रभाकर कलोडे, सागर उर्फ चंद्रकांत कलोडे आणि धनराज मोरस्कर यांनी शेतात जाऊन चेतनला हे शेत आम्ही तुझ्या वडिलांकडून विकत घेतलेे, तू येथे काय करतोस? असे म्हणत वाद घातला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. चेतनला शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी सागर कलोडे याने चेतनचा मोबाईल हिसकावून तो दगडावर आपटून फोडला. चेतनच्या तोंडावर व गळ्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
farm-dispute सुरुवातीला प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उपचार घ्यावे लागले. प्रकृती सुधारताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. चेतन बोकडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रभाकर कलोडे, सागर कलोडे आणि धनराज मोरस्कर रा. सिंदी (रेल्वे) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास दहेगाव (गोसावी) पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी राधाकिशन रामचंद्र घुगे करत आहेत.