नागपूर,
Ganeshpeth Raja, 111 Years सन १९१५ मध्ये स्थापन झालेल्या गणेशपेठचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा १११व्या वर्षात पदार्पण केले असून त्यानिमित्त आयोजित पाठपूजन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री गणरायाच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर विधीवत पूजा व महाआरती करून १११ वर्षांच्या गौरवशाली परंपरेला अभिवादन करण्यात आले. Ganeshpeth Raja, 111 Years यावेळी गणेशपेठच्या राजाच्या मूर्तीला अनेक वर्षांपासून आकर्षक स्वरूप देणारे मूर्तिकार वामन देवरावजी दुरगकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ज्येष्ठ सदस्य, गणेशभक्त आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदाचा १११ वा गणेशोत्सव अधिक भव्य, दिव्य आणि ऐतिहासिक स्वरूपात साजरा करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
सौजन्य:विनायक डेहनकर,संपर्क मित्र